Maharashtra

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ण दिवस बंद; तातडीच्या देखभाल दुरुस्तीमुळे महापालिकेचा निर्णय

​पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ण दिवस बंद; तातडीच्या देखभाल दुरुस्तीमुळे महापालिकेचा निर्णय

पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या तातडीच्या विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे.
​पुणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या या कामामुळे बुधवार रात्री १२:०० वाजल्यापासून ते गुरुवार रात्री १२:०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल.

पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आदल्या दिवशीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने आणि नियोजित पद्धतीने करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम आणि महापौर मा. सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
​शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button