Maharashtra

महापालिका सभा ५ मेपर्यंत स्थगित; अर्थसंकल्प घोषणेवरून गैरसमज

महापालिका सभा ५ मेपर्यंत स्थगित; अर्थसंकल्प घोषणेवरून गैरसमज

पुणे, २३ एप्रिल २०२६:
सोमवार, २० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली महापालिका सभा ५ मेपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली. सभेच्या स्थगितीपूर्वी अर्थसंकल्प २०२६–२७ ला अंतिम मान्यता देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर प्रश्न निर्माण झाले असून, काही गैरसमजही पसरल्याचे समोर आले आहे.
महापौरांनी स्पष्ट केले की, सभेदरम्यान नगरसचिवांकडून सभेचा क्रम, उपसूचना आणि कार्यपद्धती याबाबत आवश्यक माहिती वेळेवर देण्यात आली नव्हती. यामुळे घडलेल्या त्रुटीची जबाबदारी स्वीकारत त्यांनी ही बाब मान्य केली.
तथापि, महापालिका सभेत काही चूक किंवा नियमबाह्यता झाल्यास ती दुरुस्त करण्याचे अथवा नियमित करण्याचे अधिकार महापौरांना असल्याचे त्यांनी नमूद केले.
यापुढे अशा प्रकारची त्रुटी होऊ नये यासाठी पूर्ण दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन देत महापौरांनी सर्व संबंधितांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही सांगितले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button