भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष आदित्य कुलकर्णी

भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष आदित्य कुलकर्णी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
अक्षय तृतीया शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) संघटनात्मक स्तरावर महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात सक्रिय युवा कार्यकर्ते आदित्य कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड झाली आहे.
ही नियुक्ती स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते देण्यात आली. यमुनानगर, निगडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दीर्घकाळ कार्यरत असलेले कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या माध्यमातून तळागाळापासून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत संघटनेत मजबूत पकड निर्माण केली आहे.
नियुक्तीनंतर बोलताना कुलकर्णी म्हणाले, “पक्ष नेतृत्वाचे मी आभार मानतो. शहरातील तरुण उद्योजकांना एकत्र आणून शासनाच्या उद्योगविषयक योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देणार आहे.”
राजकीय व सामाजिक क्षेत्रातून या निवडीचे स्वागत होत असून, कुलकर्णींच्या नेतृत्वामुळे युवा मोर्चा उद्योग आघाडीला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429