Maharashtra

कराड येथे ‘हिंदू धर्मयोध्दा पुरस्कार’ जाहीर

कराड येथे ‘हिंदू धर्मयोध्दा पुरस्कार’ जाहीर

कराड, २३ एप्रिल २०२६: सातारा जिल्ह्यातील हिंदू एकता आंदोलनतर्फे यंदाचा ‘हिंदू धर्मयोध्दा पुरस्कार’ प्रख्यात युट्युबर प्रभाकर सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता कराड येथील दत्त चौक परिसरात आयोजित करण्यात आला. शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या शाही दरबार मिरवणुकीनंतर हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाकर सूर्यवंशी यांच्या युट्यूब माध्यमातून करण्यात येणाऱ्या सामाजिक जागृती, सांस्कृतिक मूल्यांचे जतन आणि हिंदू एकतेसाठीच्या प्रयत्नांना या पुरस्काराद्वारे गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी अभिमान आणि उत्साह व्यक्त केला.
हिंदू एकता आंदोलनाने अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा आपला निर्धार पुन्हा अधोरेखित केला.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button