Maharashtra

भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर कायम; IMF कडून स्थैर्याची पुष्टी

भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर कायम; IMF कडून स्थैर्याची पुष्टी

नवी दिल्ली : इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (IMF) च्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक अहवालानुसार, भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून मजबूत स्थितीत आहे. युनायटेड स्टेटआणि चायना यांच्यानंतर भारताने जपान जर्मनी आणि यांना मागे टाकत हे स्थान कायम राखले आहे.
IMF च्या आकडेवारीनुसार, भारताचा नॉमिनल GDP सुमारे 4.3 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचला असून, देशाची आर्थिक घोडदौड सुरूच आहे. 2026 साठी भारताचा विकासदर 6.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, जो अनेक विकसित देशांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.
या प्रगतीमागे सेवा क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाढ, निर्यातीत झालेली वाढ आणि परकीय थेट गुंतवणूक (FDI) यांचा मोठा वाटा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर पसरत असलेल्या ‘भारताची अर्थव्यवस्था घसरत आहे’ या अफवांना IMF च्या अहवालाने पूर्णविराम दिला आहे. उलट, भारताची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत.
स्रोत: IMF – World Economic Outlook (ऑक्टोबर 2025)

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button