Maharashtra

जगदंबा हाउसिंग सोसायटीत महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी.

जगदंबा हाउसिंग सोसायटीत महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

पिंपरी-चिंचवड : जगदंबा हाउसिंग सोसायटी, डी-12 येथे रविवार (दि. 19 एप्रिल 2026) रोजी तथागत गौतम बुद्ध, बसवेश्वर महाराज, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील घेऊन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. या वेळी सोसायटीतील महिला-पुरुष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. राजू उबाळे (कार्याध्यक्ष, आर.पी.आय., पिंपरी-चिंचवड शहर), मा. प्रमोद कांबळे, मा. इंद्रसेन गोरे (वंचित बहुजन आघाडी सदस्य), मा. कैलास लोखंडे (महासचिव, घरकुल शाखा), मा. बादल आठवले, मा. भारत चंदनशिवे, मा. गायकवाड (गुलमोहर सोसायटी, डी-11), मा. बळीराम काकडे तसेच आयुनी खरात मावशी, आयुनी सविताताई डोंगरे, आयुनी ज्योतीताई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. सोसायटीतील मा. कुंभार, मा. पवार, आयुनी हेरोडे ताई, आयुनी गायकवाड ताई यांच्यासह सर्व नागरिकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. धर्मराज गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन मा. प्रवीण हेरोडे यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमातून सामाजिक एकात्मता व महापुरुषांच्या विचारांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button