Maharashtra
सांगली नगरपालिका प्रशासन झोपा काढतंय का???
सांगली नगरपालिका प्रशासन झोपा काढतंय का???
सांगली :दि. 22 एप्रिल 2026:-
पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची निविदा प्रक्रिया रखडल्याने महापौर धीरज सूर्यवंशी यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
वेळेत कामे न झाल्यास पाणी साचण्याची समस्या निर्माण होईल, असा इशारा देत त्यांनी तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत नालेसफाईला प्राधान्य, कर्मचारी टंचाईवर आउटसोर्सिंगचा पर्याय, कचरा संकलनासाठी जुन्या वाहनांची पुनर्व्यवस्था आणि पूरस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन व स्थलांतर आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले. कामात हलगर्जी सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार : विजय रणभोर
