Maharashtra
मानवतेचा अंत! बुलढाण्यात ४ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचारानंतर हत्या; आरोपीला फाशीची मागणी”
“मानवतेचा अंत! बुलढाण्यात ४ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचारानंतर हत्या; आरोपीला फाशीची मागणी”
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खडका गावात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध घेत असताना तिचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा—फाशी—देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून संशयितांचा शोध सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429
