Maharashtra

एसटी’चा मोठा निर्णय! रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख होणार ‘लालपरी’चे ब्रँड ॲम्बेसेडर

‘एसटी’चा मोठा निर्णय! रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख होणार ‘लालपरी’चे ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि रस्ता सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची ‘लालपरी’ म्हणजेच एसटी बसची नवी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळ आणि देशमुख दाम्पत्य यांच्यातील हा करार पाच वर्षांसाठी असणार आहे. या कराराचा अधिकृत सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या निर्णयामुळे एसटीची प्रतिमा उंचावण्यास आणि विशेषतः तरुण प्रवाशांना आकर्षित करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या नियुक्तीच्या कार्यक्रमासाठी वेळ देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. लवकरच एका भव्य कार्यक्रमात या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळासाठी यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि मकरंद अनासपुरे यांनी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम केले आहे. आता देशमुख दाम्पत्याच्या लोकप्रिय आणि ग्लॅमरस प्रतिमेमुळे एसटीच्या प्रचाराला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे एसटी सेवांविषयी तरुणांमध्ये आकर्षण वाढण्याची शक्यता
रस्ता सुरक्षेबाबत प्रभावी जनजागृती
अधिक आधुनिक आणि सकारात्मक होणार

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button