छत्रपती संभाजीनगर हादरले; किरकोळ वादातून शेजारीणीची चाकू व गोळ्या झाडून हत्या
छत्रपती संभाजीनगर हादरले; किरकोळ वादातून शेजारीणीची चाकू व गोळ्या झाडून हत्या
छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. साई श्रद्धा पार्कमध्ये राहणाऱ्या शैला सोनार या महिलेने शेजारीण साधना सोनपेटकर यांच्यावर घरात घुसून चाकूने वार करत गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ही घटना घडली. आरोपी शैला सोनार हिने साधना सोनपेटकर यांच्या घरात प्रवेश करून आधी चाकूने वार केले. त्यानंतर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. या हल्ल्यात साधना सोनपेटकर यांचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्यादरम्यान झालेल्या झटापटीत आरोपी शैला सोनारही जखमी झाली आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. किरकोळ वादातून ही घटना घडली की जुन्या वैमनस्यातून, याचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429