Maharashtra
पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण; हलक्या पावसाची सुरुवात
पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण; हलक्या पावसाची सुरुवात
पुणे / पिंपरी-चिंचवड, दि. २० एप्रिल २०२६:
आज सकाळपासूनच शहरातील वातावरणात बदल जाणवत असून आकाश ढगांनी व्यापलेले आहे. काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरींनाही सुरुवात झाली आहे.
गेल्या काही दिवसांतील उकाड्यानंतर आज सकाळीच आलेल्या या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड, चिंचवड, भोसरी तसेच पुणे शहरातील विविध भागांत हलका पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांत ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी बाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

