धुळ्यातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; सीसीटीव्हीमध्ये दिसले धक्कादायक दृश्य, परिसरात दहशतीचे वातावरण
धुळ्यातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; सीसीटीव्हीमध्ये दिसले धक्कादायक दृश्य, परिसरात दहशतीचे वातावरण
धुळे शहरातील सहजीवननगर परिसरातून संजीवनी राहुल वराडे ही १८ वर्षीय तरुणी शुक्रवारी (१७ एप्रिल) भरदिवसा बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील एका संशयास्पद सीसीटीव्ही फुटेजमुळे सध्या शहरात भीती आणि विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजीवनी ही शुक्रवारी दुपारी अचानक घरातून बेपत्ता झाली. बराच वेळ शोध घेऊनही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संजीवनी जाताना कैद झाली आहे. मात्र, या फुटेजमधील तिची चालण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजीवनी अतिशय विचित्र पद्धतीने चालताना दिसत आहे. तिचा एक हात हवेत वरच्या बाजूला असून, जणू काही एखादी अदृश्य शक्ती तिला ओढत नेत आहे, असे त्या दृश्यावरून भासत आहे. ती स्वतःहून चालत नसून कोणीतरी तिला खेचत असल्याचे या चित्रणात दिसून येते.
जादूटोणा की संमोहन?
या विचित्र फुटेजमुळे परिसरात सध्या दहशतीचे वातावरण आहे. संजीवनीवर कोणी संमोहन (Hypnotism) केले असावे किंवा हा जादूटोण्याचा (Black Magic) प्रकार असावा, अशी शंका स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही या दृश्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
धुळे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून तरुणीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमधील तांत्रिक बाबींचाही तपास केला जात आहे. “आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,”
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
