Maharashtra

श्री संत तुकाराम महाराज मंदिर टाकळीभान यांना जगताप कुटुंबीयांकडून दोन मोठ्या समया भेट.

श्री संत तुकाराम महाराज मंदिर टाकळीभान यांना जगताप कुटुंबीयांकडून दोन मोठ्या समया भेट,

टाकळीभान (प्रतिनिधी )– श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सुरू असलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचे काम सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे थोड्या दिवसातच श्री संत तुकाराम महाराज यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने संत तुकाराम महाराजांचे भक्त असलेले जगताप कुटुंबीय यांनी चार चार किलो वजनाच्या पितळी समया मंदिरास भेट म्हणून दिले आहेत

टाकळी वांजवडीलच असलेल्या जगताप वस्ती परिसरात राहणारे श्री अमोल दत्तात्रय जगताप, सौ सुजाता अमोल जगताप, कुमारी तृप्ती अमोल जगताप, चि. गणेश अमोल जगताप या परिवाराकडून चार चार किलोच्या दोन तीन फूट उंचीच्या पितळी समया जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिरात भेट म्हणून दिल्या असून त्यांचा तुकाराम महाराज मंदिर सेवेकरींच्या वतीने छोटासा सन्मान करण्यात आला.

टाकळीभान मध्ये भव्य दिव्य असे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे मंदिर उभे राहत असून देणगी देणाऱ्यांचे हात चालूच असून अजूनही जास्तीत जास्त जिनकेदारांनी हात पुढे करून मंदिर बांधकामास मदत करावी अशी सेवेकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात येते जगताप परिवाराचा सन्मान करत असताना मंदिराची सेवेकरी दिगंबर पांडे, गवांदे सर, रोहिदास पटारे, राजेंद्र माने आधी सेवेकरी उपस्थित होते

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button