Maharashtra

कोल्हापूर: व्याजाच्या पैशांसाठी महिलेवर ३ वर्षे अत्याचार; सावकारावर बलात्काराचा गुन्हा

कोल्हापूर: व्याजाच्या पैशांसाठी महिलेवर ३ वर्षे अत्याचार; सावकारावर बलात्काराचा गुन्हा

कोल्हापूर, २३ एप्रिल २०२६: व्याजाच्या पैशांची परतफेड होऊ न शकल्याचा गैरफायदा घेऊन एका सावकाराने विवाहित महिलेवर सलग तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या गांधीनगर परिसरात उघडकीस आली आहे. गांधीनगर पोलिसांनी संशयित आरोपी अमित सावंत (वय ३८) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिलेने तीन वर्षांपूर्वी अमित सावंत याच्याकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, व्याज आणि मुद्दल फेडणे तिला कठीण गेले. याचा फायदा घेत आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि सातत्याने लैंगिक अत्याचार केले.
अत्याचारांवरच न थांबता, आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ तिच्या जावयाला दाखवण्याची धमकी देत तो वारंवार पैशांची मागणी करत होता. या जाचाला कंटाळून पीडितेने धाडस दाखवत गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, आरोपीचा शोध घेण्याचे आणि पुढील तपासाचे काम सुरू आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button