माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’; महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये ऐतिहासिक घोषणाबातमी:
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’; महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये ऐतिहासिक घोषणाबातमी:
मुंबई : महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करण्याची मोठी घोषणा केली. हा अर्थसंकल्प अजित दादांना समर्पित असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रशासकीय कामकाज आणि नागरी सोयीसुविधांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येईल. अजित पवार यांच्या गतिमान कार्यपद्धतीचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले. त्यांनी तब्बल ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता, ज्याचा हा गौरव आहे.विधानसभेत घोषणा होताच सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला. याशिवाय अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णयही जाहीर झाला. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रशासकीय सुधारणेला चालना देईल, असे अपेक्षित आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


