Maharashtra

रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर

रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर, तंबाखू, पान मसाला विकणाऱ्यांवर कारवाई, पान मसाला येतो कुठून सखोल शोधमोहीम राबवणार काय?

रत्नागिरी :दि. 21 एप्रिल 2026:-
रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासन जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आलेले दिसून येत आहे. प्रतिबंधित करण्यात आलेले तंबाखू व पान मसाला यामुळे मानवी जीविकास धोका निर्माण होतो हे माहीत असताना देखील अशा प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करताना आढळून आल्याने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये तंबाखू पान मसाला यांचे ७९ पॅकेट व ६४९ पाऊचेस मिळून आले असून एकूण सुमारे ११,५१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १०७/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १२३,२२३, २७४,२७५, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी तृप्ती घरत यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान रत्नागिरी शहरात प्रतिबंधित तंबाखू, पानमसाला नेमका येतो कुठून, त्याचे रत्नागिरी शहरात सप्लायर्स कोण कोण आहेत?, तंबाखू, पानमसाला यांची मागणी कशी केली जाते, कोणत्या वाहनांचा उपयोग केला जातोका,व कसा केला जातो ? अशी सखोल चौकशी पोलिस प्रशासनाकडून केली जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button