Maharashtra

जाडरबोबलाद हादरले! अंधश्रद्धेच्या पायी कुटुंबावर जीवघेणा हल्ला; तिघांवर गुन्हे दाखल

जाडरबोबलाद हादरले! अंधश्रद्धेच्या पायी कुटुंबावर जीवघेणा हल्ला; तिघांवर गुन्हे दाखल

( प्रतिनिधी ) जत : अंधश्रद्धेतून शेजाऱ्यांनी एका कुटुंबावर क्रूरपणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथे घडली आहे.’तुमची चार वर्षांपूर्वी मृत झालेली मुलगी भूत बनून आमच्या घरातील महिलेला झपाटते’,असा अजब आरोप करत हा हल्ला करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार,१२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास महानंदा ईश्वरप्पा ऐनापुरे (वय ४०) यांच्या नवीन घरासमोर ही घटना घडली.संशयित आरोपी शिवानंद दोंडाप्पा माडग्याळ,प्रवीण शिवानंद माडग्याळ आणि प्रशांत शिवानंद माडग्याळ (सर्व रा. जाडरबोबलाद) हे दुचाकीवरून आले आणि त्यांनी महानंदा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी महानंदा यांचा मुलगा अनिल याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेले महानंदा यांचे पती ईश्वरप्पा ऐनापुरे यांच्या डोक्यावर शिवानंद याने काठीने प्रहार केला,ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी महानंदा ऐनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमदी पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

प्रतिनिधी : संजय कोळी.
७८७५९०३७७७.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button