Maharashtra

सांगलीच्या लेकीला सांगलीकरांची मानवंदना ;

सांगलीच्या लेकीला सांगलीकरांची मानवंदना ;


सांगली :दि. 12 एप्रिल 2026; प्रशासकीय कौशल्य, कार्यतत्परता आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर राज्यभर ठसा उमटवणाऱ्या वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी सांगलीत लवकरच भव्य नागरिक सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे संपूर्ण शहरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या विशेष भेटीत भिडे यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर सांगलीकरांच्या वतीने त्यांना मानपत्र प्रदान करून विशेष गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिकेकडून त्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले असून त्यांनीही या सन्मानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिलाशी या गावची कन्या असलेल्या अश्विनी भिडे या सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाची राज्यभर चर्चा आहे. यापूर्वी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना त्यांनी मुंबई मेट्रो-३ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नवे बळ दिले.

तांत्रिक गुंतागुंत आणि प्रशासकीय अडथळ्यांवर मात करत प्रकल्पाला गती देण्यात त्यांची निर्णायक भूमिका ठरली. त्यांच्या कार्यामुळे केवळ मुंबईच्या पायाभूत सुविधांना चालना मिळाली नाही, तर सांगली जिल्ह्याचे नावही अभिमानाने उजळले आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाच्या सन्मानासाठी सज्ज झालेल्या सांगलीकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

पत्रकार : विजय रणभोर. पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button