Maharashtra

घरकुल, चिखली येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न.

पिंपरी चिंचवड : घरकुल, चिखली येथील शिवमुद्रा डी-लाईन उत्सव कमिटीच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेला शिवजन्मोत्सव सोहळा शुक्रवारी (दि. ६ मार्च) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. डी-१४ बिल्डिंग समोरील मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा पार पडला. सायंकाळी महिला मंडळाच्या वतीने लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मुलांच्या देशभक्तीपर व शिवचरित्रावर आधारित सादरीकरणांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या शिवभक्तीपर किर्तनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. टीव्ही स्टार शिवकिर्तनकार ह.भ.प. शिवलिलाताई पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम व कार्याचा गौरव करत शिवभक्तीपर किर्तन सादर केले. त्यांना ह.भ.प. बबन महाराज खेकाळे यांची गायन साथ लाभली.

या प्रसंगी पिंपरी चिंचवड नगरसेवक निलेश मधुकर नेवाळे, कुंदनशेठ गायकवाड, नगरसेविका रिटाताई सानप, नगरसेविका योगिताताई नागरगोजे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवमुद्रा डी-लाईन उत्सव कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, सचिव दयानंद साठे तसेच सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, शिवभक्त व स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले. 🚩

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button