रत्नागिरीत बुद्धविहाराबाबत वादग्रस्त वक्तव्यांवरून स्पष्टीकरण; ट्रस्टची पत्रकार परिषद
रत्नागिरीत बुद्धविहाराबाबत वादग्रस्त वक्तव्यांवरून स्पष्टीकरण; ट्रस्टची पत्रकार परिषद
रत्नागिरी, दि. 17 एप्रिल 2026 :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रत्नागिरीतील थिबा राजा कालीन बुद्धविहार परिसरात काही व्यक्तींनी बौद्ध विहाराबाबत चुकीची व दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याचा आरोप समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी बौद्ध विहार ट्रस्टने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, थिबा राजा कालीन बुद्धविहार येथे कोणतेही कम्युनिटी सेंटर उभारण्यात येणार नसून, त्या ठिकाणी केवळ बौद्ध विहारच उभारला जाणार आहे. काही अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे समाजात संभ्रम निर्माण होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
गुरुवारी (दि. 16 एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयावर सविस्तर माहिती देत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
या पत्रकार परिषदेला मारुती कांबळे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, सुहास कांबळे, शिवराज जाधव, प्रीतम आयरे, सुनील कांबळे, मिलिंद कांबळे, नरेश कांबळे, किरण पवार, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
— विजय रणभोर, पुणे