कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशाला त्रास
कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशाला त्रास
रत्नागिरी/कोकण (प्रतिनिधी):
भारतीय रेल्वेच्या सेवांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडील घटनेत, कन्फर्म तिकीट असतानाही एका कोकणी प्रवाशाला गाडीत चढता आले नाही. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नसून वारंवार घडणारी समस्या असल्याचे समोर आले आहे.
प्रवाशांच्या मते, रिझर्व्हेशन डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांची वाढती गर्दी ही या समस्येची मुख्य कारणे आहेत. अनेकदा वेटिंग तिकीटधारक किंवा विनातिकीट प्रवासी रिझर्व्हेशन कोचमध्ये घुसतात, ज्यामुळे कन्फर्म तिकीटधारकांनाही जागा मिळत नाही. यासोबतच तिकीट तपासणीतील ढिसाळपणा आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्क्रियता यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. असे प्रकार रोजच चालू आहेत वारंवार
रिझर्व्हेशन डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांचा शिरकाव
टीटीईकडून कारवाईचा अभाव
कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो
प्रवाशांनी सांगितले की, “हे प्रकार नवीन नाहीत. प्रत्येक सिझनला, विशेषतः सुट्टीच्या काळात, अशीच परिस्थिती निर्माण होते. अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही.प्रशासनाने
कडक तिकीट तपासणी मोहीम राबवावी
रिझर्व्हेशन कोचमध्ये अनधिकृत प्रवेश पूर्णपणे बंद करावा
दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
कन्फर्म तिकीटधारकांच्या सुरक्षेची आणि सोयीची हमी द्यावी
दोन-दोन महिने आधी तिकीट आरक्षित करूनही प्रवाशांना असा त्रास सहन करावा लागत असल्याने, रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रिझर्व्हेशन डब्यात प्रवेश मिळावा, यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे
📞 9822548429

