Maharashtra

ना.विखे पाटील यांच्या निधीतून हरेगावचा विकास करू – पटारे.

ना.विखे पाटील यांच्या निधीतून हरेगावचा विकास करू – पटारे

टाकळी भान प्रतिनिधी- पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे अनेक विकास कामे पूर्ण करीत असून हरेगाव चा विकास देखील त्यांच्या निधीतून गावचे सरपंच दिलीप त्रिभुवन यांच्या माध्यमातून करू असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे यांनी जॉगिंग ट्रॅक शुभारंभ प्रसंगी केले.

ना. विखे पाटील यांच्या निधीतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पेव्हिंग ब्लॉक चे जॉगिंग ट्रॅक व ब्राह्मणगाव फाटा ते शिव मारुती मंदिर स्ट्रीट लाईट कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार लहुजी कानडे हे होते. यावेळी बाजार समिती चे संचालक गिरीधर आसने, डॉ. शंकरराव मुठे, भाऊसाहेब बांद्रे,अशीभाई पोपटीया, सरपंच दिलीप त्रिभुवन, ग्रामपंचायत सदस्य रमेश भालेराव, दीपक नवगिरे, अशोक बोधक, काशिनाथ जगताप, आर के गोरे, गुलाबराव पठारे, भाऊसाहेब व्हासाले, मिलिंद मोरे, सुनील ओहोळ, नानाभाऊ काटे, संजय भानगडे, हरीश मढीकर, अशोक शरणागते , आशिष शिंदे, राजेंद्र देशमुख, अलेक्झ दुशिंग, आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सुनील पवार यांनी आभार मानले.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button