यात्रेत धुडगूस घालणाऱ्यांची गय करणार नाही,-पो, नि, अरूण धनवडे .
यात्रेत धुडगूस घालणाऱ्यांची गय करणार नाही,-पो, नि, अरूण धनवडे

टाकळीभान प्रतिनिधी :-टाकळीभानच्या यात्रेत धूडगुस घालून यात्रेस गालबोट लावणार्या टवाळखोरांची कुठलीही गय केली जाणार नसल्याचा इशारा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षका अरूण धनवडे यांनी दिला आहे. सोमवार दि.२० व मंगळवार दि.२१ रोजी टाकळीभान येथे श्री शंभू महादेवाचा यात्रौत्सव संपन्न होणार आहे. पार पडणारी यात्रा ही शांततेने पार पाडावी. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. यात्रा कमिटीनेही कुठे काही अनूचित प्रकार आढळ्यास पोलीस यंत्रनेशी संपर्क साधावा. अनूचित प्रकार करणार्या व यात्रेस गालबोट लावणाऱ्यास कठोरात कठोर कारवाई करून बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे पो.नि.धनवडे यांनी यावेळी सांगीतले. या बैठकीस यात्रा कमिटी सदस्य, शंभू महादेव भक्त व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.