Maharashtra

जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं;

जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं;

धाराशिव :(खामसवाडी):दि. 19 एप्रिल 2026:-
धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून चुलत्यानेच पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विलास शेळके असे आरोपी चुलत्याचे नाव आहे. त्याने आपल्या पुतण्या सुजित शेळके याच्या पोटावर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

जमीन व्यवहारातून आरोपी आणि मयत सुजित शेळके यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान सुजित शेळके हा रात्री आपल्या आजी आजोबांसोबत झोपलेला असताना आरोपीने येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या बाचाबाचीचे रूपांतर भांडणात झाले. त्यावेळी आरोपीने चाकूने वार करत सुजित शेळके याची हत्या केली. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृत सुजित शेळके यांच्या आईच्या जवाबावरून शिराढोण पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चुलत्यानेच पुतण्याची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पत्रकार : विजय रणभोर. पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button