Maharashtra
वरळीत महायुतीचा जनआक्रोश मोर्चा; वाहतूक कोंडीमुळे संतप्त महिला मंत्र्यावर भडकली
वरळीत महायुतीचा जनआक्रोश मोर्चा; वाहतूक कोंडीमुळे संतप्त महिला मंत्र्यावर भडकली
मुंबई: महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजप-महायुतीने वरळीत ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला. मात्र, यामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीने सर्वसामान्य त्रस्त झाले. एका महिलेच्या मंत्री गिरीश महाजनांवर भडकलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मोर्च्यामुळे वरळीतील रस्ते पूर्ण जाम झाले. वाहनांची लांब रांगा लागल्याने नागरिक कामावर-घरी पोहोचण्यास अडकले. यात अडकलेल्या एका महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट महाजनांना “लवकर चालते व्हा” म्हणत जाब विचारला.
राजकीय आंदोलनांमुळे मुंबईकरांना नेहमी वाहतूक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही घटना सामान्यांच्या मनातील संतापाचे प्रतीक ठरली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429


