Maharashtra

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचा ऑलिंपियाडमध्ये झेंडा .

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचा ऑलिंपियाडमध्ये झेंडा .

 

टाकळीभान प्रतिनिधी : घोगरगाव येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑलिंपियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.या या परीक्षेमध्ये एकूण 34 विद्यार्थी बसले होते ते सर्व विद्यार्थी ओलंपियाड परीक्षांमध्ये पास झाले आहेत.

या परीक्षेत इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. भक्ती डिके(math)हिने वर्गात सर्वाधिक गुण मिळवून क्लास टॉपर ठरत गोल्ड मेडल पटकावले. तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी गायत्री विठ्ठल मेघळे (Math) हिने उत्कृष्ट गुण मिळवत एक्सलन्स अवॉर्ड मिळवला.

संस्कृती रविंद्र चोभे (Math) हिने स्टेट टॉपर म्हणून मान पटकावला. तसेच इयत्ता आठवीतील वेदांत बनकर, कृष्णा जाधव आणि संघर्ष सुपेकर यांनीही स्टेट टॉपर ठरत उल्लेखनीय यश मिळवले.

विषयानुसार यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयात भक्ती पांडुरंग डिके (Math), तर चित्रकला विषयात कृष्णा दहातोंडे (Math), पूजा राठोड (Math), वेदांत बनकर आणि संघर्ष सुपेकर यांचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना ऑलिंपियाड स्पर्धा विद्यालयात यशस्वीपणे पार पाडून मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणजे. कृष्णा वसंत शिंदे, श्रीमती अर्चना जगताप. संकेत सावंत, महेश सरोदे व दिवे मॅडम होते.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सुमती घाडगे पाटील, उपाध्यक्ष स्नेहल चव्हाण, विश्वस्त चेतन चव्हाण पाटील, सचिव मनीष घाडगे पाटील, सहसचिव डॉ. श्रुती आमले पाटील, तसेच विद्यालयाचे प्राचार्य संतोष जावळे सर, सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे विद्यालय व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.

प्रतिनिधी : दिलीप लोखंडे श्रीरामपूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button