Maharashtra

आमदार शंकर जगताप यांची पीसीएमसीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची मागणी

आमदार शंकर जगताप यांची पीसीएमसीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची मागणी

पिंपरी-चिंचवड, दि. १८ एप्रिल २०२६:
शहरातील वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे महावितरणच्या यंत्रणेवर वाढता ताण पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी चार नवीन महावितरण कार्यालयांची मागणी केली आहे.
देहूरोड शाखेचे विभाजन करून रावेत येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, तसेच काळेवाडी, बिजलीनगर आणि हिंजवडी येथे नवीन कार्यालये उभारावीत, अशी त्यांची मागणी आहे.
पुण्यात ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी वीज पुरवठ्यातील अडचणी, प्रलंबित प्रकल्प आणि निधीअभावी रखडलेली कामे याकडे लक्ष वेधले. या बैठकीस विविध लोकप्रतिनिधी आणि महापारेषणचे अधिकारी उपस्थित होते.
ताथवडे येथे अतिउच्च दाबाचे सब-स्टेशन उभारण्यासंदर्भातही त्यांनी सूचना दिल्या असून, महापारेषणकडून सुमारे १९ कोटी रुपयांच्या खर्चातून लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच वीजवाहिन्या मजबूत करणे, अतिरिक्त रोहित्र बसवणे आणि हिंजवडी आयटी पार्कची वीज क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
प्रत्येक मतदारसंघात ‘विद्युत वितरण नियंत्रण समिती’ स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे, ज्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण होईल.

या उपाययोजनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अधिक चांगली वीज सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button