भाजप स्थापना दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रमांचा उत्साह
भाजप स्थापना दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रमांचा उत्साह

पिंपरी-चिंचवड, दि. १९ एप्रिल २०२६:
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. पक्षाच्या प्रदेश सूचनेनुसार शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडला.
या उपक्रमांना आमदार शंकर भाऊ जगताप, महेश दादा लांडगे, उमाताई खापरे, अमित जी गोरखे तसेच इतर वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले.
५ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत स्थापना दिन सप्ताह साजरा करण्यात आला. यासाठी शहर समिती स्थापन करण्यात आली असून, शहर संयोजक म्हणून भाजप शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या कालावधीत शहरातील जनसंपर्क कार्यालयांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली. ज्येष्ठांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकावून जल्लोष करण्यात आला तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. परिसरातील नागरिकांच्या सहभागातून मिठाई वाटप, स्वच्छता अभियान, फळवाटप, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजूंना शालेय साहित्य वाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
स्थापना दिन सप्ताहाच्या शेवटच्या टप्प्यात “गाव चलो अभियान” राबविण्यात आले. यामध्ये कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घरी जाऊन केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच प्रत्येक प्रभागात भिंतींवर पक्षाचे कमळ चिन्ह रेखाटणे, ज्येष्ठांचा सन्मान आणि विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा गौरव करण्यात आला.
शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयोजक मधुकर बच्चे आणि त्याच्या सहकार्यांनी हा स्थापना दिन सप्ताह यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमांमध्ये माजी खासदार, विद्यमान आमदार, नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, मंडल अध्यक्ष, बुथ प्रमुख आणि असंख्य कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

