सांगली राष्ट्रवादीत भूकंप! स्वीकृत नगरसेवक निवडीवर ३५ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
सांगली राष्ट्रवादीत भूकंप! स्वीकृत नगरसेवक निवडीवर ३५ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
सांगली, २० एप्रिल २०२६: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये मोठा भूकंप झाला आहे. पक्षाने अशोक मासाळे यांना संधी दिल्याने नाराज झालेल्या शहर-जिल्हा कार्यकारिणीच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी रविवारी सामूहिक राजीनामे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे सादर केली.
महानगरपालिकेत राष्ट्रवादीला स्वीकृत नगरसेवकपदाच्या दोन जागा मिळाल्या होत्या. अनेक इच्छुकांमध्येून मासाळे यांच्या निवडीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी झिजणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली. कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, निष्ठेला दुय्यम ठेवून निर्णय घेण्यात आला.
शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे म्हणाले, “स्वीकृत नगरसेवक निवडीमुळे पक्षात मतभेद झाले आहेत. मी राज्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.”
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429