पुणे शहर पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी भव्य नोकरी मेळावा; 3 मे रोजी आयोजन
पुणे शहर पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी भव्य नोकरी मेळावा; 3 मे रोजी आयोजन
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, 3 मे 2026 रोजी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय मैदान, Pune येथे पार पडणार आहे.
या मेळाव्यात IT, फार्मा, रिटेल, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, KPO/BPO, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग, नेटवर्किंग आणि फायनान्स अशा विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपन्यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याने नोकरीच्या संधी अधिक परिणामकारक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती गुगल फॉर्मद्वारे नोंदवणे आवश्यक आहे. त्यानुसार उमेदवारांना योग्य कंपन्यांशी जोडण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
दरम्यान, हा नोकरी मेळावा केवळ पुणे शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठीच मर्यादित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार असून, अनेक तरुणांना करिअरची दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


