Maharashtra

नागपूरमध्ये सावकाराची हत्या; कर्जातून सुरू झालेला वाद टोकाला

नागपूरमध्ये सावकाराची हत्या; कर्जातून सुरू झालेला वाद टोकाला

नागपूर : जरीपटका परिसरात व्याजाच्या पैशांवरून सुरू झालेल्या वादातून सावकाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी नवीन पुंडकर याने कोरोना काळात घेतलेल्या कर्जाच्या थकीत रकमेवरून झालेल्या वादातून राहुल साहू याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थकीत 35 हजार रुपयांच्या वादातून राहुल साहू याने नवीनच्या मुलीबद्दल अश्लील मागणी आणि आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप आहे. या संतापातून नवीनने राहुलचा खून केला, असे पोलिस तपासात समोर आले आहे.
22 तारखेला पिवळी नदीच्या पुलाखाली पोत्यात आढळलेला मृतदेह राहुल साहू याचाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी नवीन पुंडकरला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे जरीपटका परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button