कल्याणमधील धक्कादायक घटना: रुग्णवाहिकेच्या ४० मिनिटांच्या उशिरीमुळे वृद्धाचा रस्त्यावर मृत्यू
कल्याणमधील धक्कादायक घटना: रुग्णवाहिकेच्या ४० मिनिटांच्या उशिरीमुळे वृद्धाचा रस्त्यावर मृत्यू
कल्याण, २3 एप्रिल २०२६: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे एका वृद्ध व्यक्तीचा जीव गेल्याची घटना समोर आली. अवघ्या ३ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिका पोहोचायला ४० मिनिटे लागल्याने त्यांचा उपचारापूर्वीच रस्त्यावर तडफडून मृत्यू झाला.कल्याण रेल्वे स्टेशनजवळील दीपक हॉटेल परिसरात वृद्ध व्यक्तीला अचानक छातीत दुखापत झाली. प्रकृती खालावत पाहून त्यांनी तात्काळ ‘१०८’ आपत्कालीन सेवेला फोन केला आणि रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, दीपक हॉटेल ते रुक्मिणीबाई रुग्णालय हे फक्त ३ मिनिटांचे अंतर असतानाही रुग्णवाहिका ४० मिनिटांनी उशीराने पोहोचली. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
नागरिकांतून प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “काही मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागला, तर आपत्कालीन सेवेचा काय उपयोग?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
ही घटना कल्याणकरांसाठी धोक्याची घंटा म्हणून ठरली असून, रुग्णवाहिका सेवेच्या सुधारणेची मागणी जोर धरत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429


