कल्पना नगर, विश्राम नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

कल्पना नगर, विश्राम नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी
नागपूर : स्थानिक कल्पना नगर, विश्राम नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
14 आणि 15 एप्रिल 2026 या दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केक कापून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, ड्रॉईंग स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा, महिला व पुरुषांची संगीत खुर्ची स्पर्धा, लहान मुलांची संगीत खुर्ची तसेच नृत्य स्पर्धा अशा विविध रंगारंग कार्यक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दिनांक 15 एप्रिल रोजी जयंती समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय दहिवले साहेब सचिव समाज कल्याण विभाग निवृत्त अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. बालचंद्र नाईक साहेब निवृत्त वनाधिकारी आणि श्री. बागडे साहेब निवृत्त बँक अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
याच वेळी दहावी सीबीएससी परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या मयूर नानोरे या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. राजेश ढोके यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. संध्या ढोके यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक श्री. गुनिरत्न भंडारे साहेब यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. तसेच श्री. चतुर्भुज भैसारे साहेब, श्री. जगदीश मेश्राम साहेब, श्री. रंगारी साहेब, श्री. घरडे साहेब, श्री. भीमराव रंगारी, श्री. घनश्यामजी सातपुते साहेब आणि श्री. बनसोड साहेब यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य केले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
