Maharashtra
विमान प्रवास महागला; इंधन दरवाढीचा थेट परिणाम
विमान प्रवास महागला; इंधन दरवाढीचा थेट परिणाम
नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील तणावामुळे जेट इंधनाच्या (ATF) किमतीत मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम विमान प्रवासावर दिसून येत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढवले आहेत.
एअर इंडिया, इंडिगो आणि आकासा एअर यांसारख्या विमान कंपन्यांनी इंधन अधिभार लागू केल्यामुळे प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिस्थिती गंभीर असून काही कंपन्यांनी अतिरिक्त सामानाच्या शुल्कातही वाढ केली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429
