Maharashtra
आपमधील फुटीच्या चर्चांवर अण्णा हजारे यांचा संताप
आपमधील फुटीच्या चर्चांवर अण्णा हजारे यांचा संताप
अहमदनगर (राळेगणसिद्धी): आम आदमी पक्षातील कथित फुटीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही नेते पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत असल्याच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
अण्णा हजारे यांनी म्हटले की, आजचे अनेक राजकारणी समाज आणि देशाच्या हितापेक्षा सत्ता व पैशाला अधिक महत्त्व देत आहेत. पक्षांतर थांबवण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मतदारांनी चारित्र्यशील आणि प्रामाणिक उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429
