Maharashtra

गो माता सन्मान दिवस” निमित्त कन्नडमध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन:-

“गो माता सन्मान दिवस” निमित्त कन्नडमध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन:-

जि. छ. संभाजीनगर:ता. (कन्नड):दि. 26 एप्रिल 2026:-
कन्नड तालुक्यात “गो माता सन्मान दिवस” निमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमातून गोमाता सेवा व सन्मानाबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाणार आहे. दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता पिशोर नाका येथून रॅलीला सुरुवात होणार असून, ती तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. रॅलीनंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

या सामाजिक उपक्रमात कन्नड शहरातील लहान मुले, महिला, तरुण तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आवाहन मनोज केशवराव पवार यांनीही केले असून, आयोजन समस्त हिंदू समाज कन्नड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button