Maharashtra

नागपूरमध्ये वाद: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यावरून खळबळ

नागपूरमध्ये वाद: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यावरून खळबळ

नागपूर: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानावर इतिहासकार आणि शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

शास्त्री यांनी भाषणादरम्यान दावा केला की, युद्धामुळे थकलेल्या शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे जाऊन राजपाट सांभाळण्याची विनंती केली होती.

हा प्रकार २३ एप्रिल २०२६ रोजी नागपूरमध्ये झालेल्या मंदिर शिलान्यास कार्यक्रमात घडला. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि मोहन भागवत उपस्थित होते. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

इतिहासकारांनी आणि विविध संघटनांनी हे विधान ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार, शिवाजी महाराजांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत राज्यकारभार स्वतः सांभाळला होता
या घटनेनंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत असून, संबंधित वक्तव्यावर कारवाईची मागणीही काही ठिकाणी होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button