Maharashtra

अ.भा. श्रीकृष्ण गोपाळ समाज संघटनेच्या वतीने तरुणांचा सत्कार.

अ.भा. श्रीकृष्ण गोपाळ समाज संघटनेच्या वतीने तरुणांचा सत्कार

टाकळीभान प्रतिनिधी : येथील अखिल भारतीय श्रीकृष्ण गोपाळ समाज संघटना यांच्या वतीने शासकीय सेवेतील विविध पदावर निवड झालेल्या तरुण युवकांचा सत्कार महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय श्रीकृष्ण गोपाळ समाज संघटनेचे पदाधिकारी व गावातील तरुण युवक उपस्थित होते. याप्रसंगी दीपक ब्राह्मणे (पुणे शहर पोलीस पोलिस) प्रमोद कलंके (पुणे लोहमार्ग पोलीस) राहुल औटी (पुणे शहर पोलीस) सोपान बनकर (अहिल्यानगर पोलीस) मेजर महेश गव्हाणे आदि युवकांचा पोलीस दल व विविध निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय श्रीकृष्ण गोपाळ संघटनेचे राज्य क्रीडा अध्यक्ष भाऊसाहेब गव्हाणे, टाकळीभान अखिल भारतीय गोपाळ समाज अध्यक्ष शहादेव ब्राह्मणे, उपाध्यक्ष बाळासाहेब सावंत खजिनदार गणेश सावंत, शिवनाथ पवार

कानिफनाथ जाधव, दादासाहेब सावंत, गव्हाणे मिस्तरी, किरण ब्राह्मणे तालुका संघटक, जिल्हा क्रीडा अध्यक्ष पंकज जाधव श्रीरामपूर तालुका अध्यक्ष विठ्ठल जाधव, गोरक्षनाथ सावंत बाबासाहेब सावंत दीपक ब्राह्मणे श्रीराम संघाचे मनोज पवार, प्रवीण ब्राह्मणे आदीसह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले तर भाऊसाहेब गव्हाणे यांनी आभार मानले.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button