Maharashtra

क्रीडा प्रबोधिनी प्रवेश* *27 ते 29 एप्रिल कालावधीत कोल्हा*पूर विभागातंर्गत निवड चाचण्या*

*क्रीडा प्रबोधिनी प्रवेश*
*27 ते 29 एप्रिल कालावधीत कोल्हा*पूर विभागातंर्गत निवड चाचण्या*

*रत्नागिरी, दि. २३ (जिमाका):- सन २०२६-२७ क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोल्हापूर विभागातंर्गत २७ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत सांगली, सातारा व कोल्हापूर या ठिकाणी विविध खेळांच्या निवड चाचण्या होणार आहेत.*

२७ एप्रिल २०२६ रोजी शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे जलतरण, सायकलिंग व बॅडमिंटन, २८ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे फुटबॉल, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अॕथलेटिक्स, मे. ध्यानचंद हॉकी स्टेडियम कोल्हापूर येथे हॉकी आणि २९ एप्रिल २०२६ रोजी दामाणी हायस्कूल सांगली येथे हॅण्डबॉल, तालुका क्रीडा संकुल मिरज येथे ज्युदो व जिम्नॅस्टिक चाचण्या होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू निर्माणाला चालना देण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी सन १९९६ पासून कार्यान्वित आहे. निवड झालेल्या खेळाडूंना दैनंदिन प्रशिक्षण, निवास, भोजन, शिक्षण, क्रीडा गणवेश इ सुविधा शासनाद्वारे पुरविण्यात येणार आहेत.

कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, खेळाडू, क्रीडा संस्था, एकविध क्रीडा संघटनांनी आपले खेळाडू सदर चाचण्यांमध्ये सहभागी करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क करावा, असे आवाहन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर सुहास पाटील यांनी केले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button