Maharashtra

बुलढाण्यात निलंबित पोलिसाला सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

बुलढाण्यात निलंबित पोलिसाला सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

बुलढाणा (अंढेरा):
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथे एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्याच सासू-सासऱ्यांनी आणि मेहुण्याने घरात घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव प्रभू चाटे असून तो मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. काही काळापूर्वी त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान त्याला निलंबित करण्यात आले आहे. तो मुंबईहून आपल्या गावी परतल्याची माहिती मिळताच सासू-सासरे आणि मेहुणा संतप्त झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधितांनी प्रभू चाटे यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला आणि त्यांना घराबाहेर खेचून आणले. त्यानंतर भररस्त्यात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. पत्नीच्या आत्महत्येच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंढेरा पोलिसांनी तत्काळ दखल घेतली आहे. सासू, सासरे आणि मेहुणा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे कायदा हातात घेण्याच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button