Maharashtra

न्यू इंग्लिश स्कूलच्या २००३–०४ एस.एस.सी. बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूलच्या २००३–०४ एस.एस.सी. बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

टाकळीभान प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथील एस.एस.सी. बोर्ड २००३–०४ बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच विद्यालयाच्या परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक पऱ्हे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बॅचमधील दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना पऱ्हे सर यांनी माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी सर्वांना जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करत, जुन्या आठवणींना उजाळा देणारे असे उपक्रम समाजबंध अधिक दृढ करतात, असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी माजी शिक्षक दहिफळे सर, चव्हाण सर, डौले सर, साठे सर, धनवडे सर, कोळसे सर, देठे मॅडम, गलांडे सर, कुदळ सर, शेजुळ सर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगते व्यक्त केली.

यावेळी सविता पटारे मोहोळ, सोनाली मगर, अर्चना नागवडे, कृष्णा भालेराव, विलास पटारे, किरण जाधव, महेश मगर, विनायक बोरुडे, प्रमोद राव, गणेश दुल्लम, सागर रणनवरे, सोमनाथ राऊत, वृषाली कोकणे, योगिता तुवर आणि कावेरी पांडांगळे यांनी मनोगत व्यक्त केले.

स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने २००३–०४ च्या बॅचने कृतज्ञतेच्या भावनेतून विद्यालयासाठी ५,००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून देण्याचे आश्वासन दिले. तसेच वस्तीगृहासाठी पाच हजार रुपयांची वस्तूरूप देणगी देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र बनकर यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वाती पटारे व गोकुळ मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संभाजी पटारे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button