टाकळीभान यात्रा कुस्तीचा फडात शाळकरी मुले व मुलींच्या कुस्त्या आकर्षण ठरल्या.
टाकळीभान यात्रा कुस्तीचा फडात शाळकरी मुले व मुलींच्या कुस्त्या आकर्षण ठरल्या,

टाकळीभान(प्रतिनिधी)— टाकळीभान आणि परीसराचे ग्रामदैवत असलेल्या येथील शंभु महादेवाचा यात्रा उत्सव अक्षय तृतियेनंतर येणाऱ्या सोमवारी साजरा करण्याची प्रथा रुढ आहे. त्यामुळे 20 एप्रिल व 21 एप्रिल रोजी पार पडलेल्या या यात्रा उत्सवात लहान लहान मुलांनी कुस्तीचा फड गाजवला मुलांबरोबरच मुलीही आता कुस्तीच्या फडात उतरण्यास सुरुवात झाली आहे दोन तरुण शाळकरी मुलींच्या कुस्तीने सर्व कुस्तीप्रेमी आकर्षित झाले ,
टाकळीभान परीसराचे ग्रामदैवत आसलेल्या शंभु महादेवाचा याञा महोत्सव गेल्या अनेक वर्षांपासुन भव्य स्वरुपात साजरा केला जातो.गंगाजल मिरवणुक, लघु रुद्राभिषेक, झेंडा मिरवणुक, छबीना मिरवणुक, शोभेच्या दारुची आताषबाजी, लोकनाट्य, कलाकारांच्या हजर्या, कुस्त्यांचा जंगी हगामा, आर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांची दोन दिवस रेलचेल आसते. त्यामुळे यंदा उन्हाची तिव्रता जास्त आसतानाही माहेरवासिनी, पै पाहुणे व परीसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने याञेत हजेरी लावल्याने गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला. लोकनाट्याच्या कलाकारांनी सादर केलेल्या अदाकारीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कुस्तीच्या फडात नामवंत मल्लांसह महीला कुस्तीगिरांचीही उपस्थिती लक्षवेधी होती.
त्यामुळे सुमारे तीन तासांपेक्षा जादा वेळ कुस्त्यांचा फड सुरु होता. मंगळवारी सायंकाळी सादर झालेल्या आर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे महीलांची उपस्थिती लक्षणीय होती. आर्केस्ट्राच्या कलाकारांनीही उत्तम सादरीकरण केल्याने अनेक गितांना प्रेक्षकांकडुन ” वन्स मोअर ” मिळत होता. दोन दिवस सुरु आसलेल्या याञा महोत्सवासाठी अप्पर पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागिय पोलीस आधिकारी जयदत्त भवर, तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सतीश दवले , पी एस आय दिलीप मंडलिक , पो हे कॉ कुमार बैसने, नवनाथ बर्डे , राजू त्रिभुवन, यांनी दोन दिवस चोख बंदोबस्त व टवाळखोरांवर बारीक नजर ठेवल्याने याञौत्सव शांततेत पार पडण्यास मदत झाली.
याञा कमेटीची गेल्या महीण्याभरापासुन याञौत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन केले होते. याञौत्सवासाठी सहकार्य करणारे ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, दोन दिवस मोफत जारचे थंड पाणी देणारे रावसाहेब आहेर, वर्गणीदार, तरुण मंडळ, जेष्ठ नागरीक, ग्रामदैवताच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी स्थानिक पञकार नेहमीच सहकार्य करीत आसल्याने याञा समितीच्या वतीने पञकारांचे विषेश आभार यावेळी मानले.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.

