Maharashtra

सक्खा भाऊ पक्का वैरी दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात:-

सक्खा भाऊ पक्का वैरी
दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात:-

जि. पुणे. ता. (दौंड): दि. 21 एप्रिल 2026:-
हिंदू वारसा हक्का कायद्याप्रमाणे वडिलोपार्जित जमिनीमध्ये मुलींनाही समान हक्क असतो. असे असतानाही कायद्याची तमा न बाळगता बहिणींना वारसा हक्कातून बेदखल करण्याचे कटकारस्थान सख्ख्या भावाने केले.

यासंदर्भात बहिणीने न्याय मागण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले असता फिर्याद मागे घेण्यासाठी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला सख्या पाठच्या भावाने केला बोरमलनाथ देवस्थानचे वारस म्हणून घेणारे पुजारी यांनी आपल्या बहिणीला जमिनीच्या वारसा हक्क मध्ये तुझा काडीचा संबंध नाही व भाच्यांचा देखील संबंध नाही असे म्हणून शिवीगाळ करीत बहिणीला व भाच्यांना मारहाण केली.स्त्री पुरुष समानता कायदा असतानी अशा घटना वारंवार घडत आहेत.
बहिणीला जीवे मारण्याचं कट रचला गेला हे बोरमलनाथ देवस्थानचे पुजारीच आहेत का असा प्रश्न बहिणीने व भाच्याने उपस्थित केला.

यवत पोलीस चौकीचे अधिकारी नारायण देशमुख यांच्याशी संवाद साधला व साहेबांनी त्यांना आश्वासन दिले कोणावरती अन्याय होऊन देणार नाही व चौधरी यांची फिर्याद नोंदवून घेतली सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button