Maharashtra
पुणे: संतोष कस्तुरे यांची ‘कार्यालय अधीक्षक’ पदी पदोन्नती

पुणे: संतोष कस्तुरे यांची ‘कार्यालय अधीक्षक’ पदी पदोन्नती
पुणे: आयकर विभागातील कर्मचारी संतोष विठ्ठल कस्तुरे यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आनंदाची ठरली आहे. पुणे येथील ‘प्रधान मुख्य आयकर आयुक्त’ कार्यालयाने जारी केलेल्या ताज्या आदेशानुसार, कस्तुरे यांची ‘कार्यालय अधीक्षक’ (Office Superintendent) या पदावर पदोन्नती झाली आहे.
यापूर्वी ते आयकर विभागात ‘कर सहाय्यक’ (Tax Assistant) म्हणून आपली सेवा बजावत होते. २४ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या (DPC) शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, ३१ डिसेंबर रोजी अधिकृत आदेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल सहकाऱ्यांकडून आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548428



