डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य आरोग्य शिबिर; २५० नागरिकांचा लाभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य आरोग्य शिबिर; २५० नागरिकांचा लाभ
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच राजेश पांडे समर्थ युवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने, भाजपा पिंपरी-दापोडी मंडल अध्यक्षा अनिताताई वाळुंजकर व सहकाऱ्यांच्या वतीने भीमनगर, पिंपरी गाव येथील बौद्ध विहारात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये मेमोग्राफी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, ब्लड शुगर यांसह सुमारे १३,५०० रुपयांच्या विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या. या उपक्रमाचा २५० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी अजित कुलथे यांनी जयंती सहसंयोजक म्हणून उपस्थिती दर्शवली. तसेच युवा कार्यकर्ते ऋषिकेश वाघेरे, मंडल अध्यक्षा अनिता वाळुंजकर, सारिका कांबळे, अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे अध्यक्ष गणेश ढाकणे, प्रदेश सदस्य गणेश वाळुंजकर, सत्यवान कुदळे, मोहन वाळुंजकर, अण्णा, आदित्य कांबळे, मारुती सोनटक्के, मुकेश दळवी, अमित तिवारी, रवी पारदे, साहिल वाळुंजकर, जयश चौधरी, रवींद्र शीलवंत तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम समाजोपयोगी ठरत नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणारा ठरला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

