अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली! आजरा चाफेगल्लीतील गटर व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ:-
अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली! आजरा चाफेगल्लीतील गटर व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ:-
जि. कोल्हापूर. ता. (आजरा):दि. 20 एप्रिल 2026;
आजरा शहरातील चाफेगल्ली परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या गटर आणि रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. या विकासकामाचा शुभारंभ नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या कामामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व दळणवळणाच्या समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे.
चाफेगल्ली भागात गटरची सुविधा नसल्याने सांडपाणी साचून राहायचे, त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. या समस्येची दखल घेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून गटर व रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कामामुळे परिसराचा कायापालट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक १७ च्या नगरसेविका सौ. पूनम लिचम, माजी नगरसेवक विलास नाईक, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीर्घ प्रतीक्षेनंतर कामाला सुरुवात झाल्याने चाफेगल्लीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष व पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.


