अक्षय्य तृतीये निमित्त पुण्यात दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग
अक्षय्य तृतीये निमित्त पुण्यात दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग
पुणे: अक्षय्य तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. बाप्पाला तब्बल ११ हजार आंब्यांचा महाभोग अर्पण करण्यात आल्याने मंदिर परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघाला.
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजित आंबा महोत्सव हा भाविकां वसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गाभाऱ्यात आंब्यांची केलेली आकर्षक सजावट पाहून बाप्पाचे रूप अधिकच लोभस दिसत होते. या सुंदर सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
विशेष म्हणजे, उत्सवानंतर हे सर्व आंबे प्रसाद म्हणून भाविकांमध्ये तसेच सामाजिक बांधिलकी जपत ससून रुग्णालय आणि इतर संस्थांमध्ये वितरित केले जाणार आहेत.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने पुण्यातील वातावरण भक्तिमय झाले असून, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
