Maharashtra

महिला आरक्षणावरून राजकारण तापले; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

महिला आरक्षणावरून राजकारण तापले; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
नवी दिल्ली (प्रतिनिधी):
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. “नारी शक्ती विधेयकाला विरोध करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल,” असा इशारा त्यांनी दिला.
“महिला आरक्षण विधेयकाचा मार्ग अडवणे म्हणजे महिलांच्या हक्कांची एक प्रकारे भ्रूणहत्या आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. महिलांना राजकीय क्षेत्रात समान संधी देण्यास विरोध करणाऱ्यांची मानसिकता देश ओळखतो, असेही ते म्हणाले.
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत अडकल्यानंतर पंतप्रधानांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “महिलांच्या सक्षमीकरणाच्या मार्गात अडथळे आणणाऱ्या प्रत्येक पक्षाला देशातील महिला मतदानाच्या माध्यमातून उत्तर देतील,” असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, “महिलांच्या बाजूने ठाम उभे राहण्याची मोठी संधी काँग्रेसकडे होती, पण त्यांनी ती गमावली.” या घडामोडींमुळे महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
या वक्तव्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा आता थेट जनतेपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, सत्ताधारी पक्ष या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button