Maharashtra

लासलगाव येथे १७ एप्रिल रोजी ‘महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन; छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती:

लासलगाव येथे १७ एप्रिल रोजी ‘महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन; छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती:

लासलगाव:दि.17एप्रिल 2026: महसूल विभागातील धोरणात्मक निर्णयांची जनजागृती करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता लासलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात पार पडणार आहे.
🔹 प्रमुख अतिथी 🔹
मा.ना. श्री. छगन भुजबळ (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री)
मा. श्री. भास्कर मुरलीधर भगरे, (खासदार दिंडोरी)
मा.श्री आ.कल्याणराव पाटील, ( माजी आमदार)
मा.श्री. नानासाहेब पाटील (मा. संचालक नाफेड )
निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विशाल नाईकवाडे व मंडळ अधिकारी रूपाली सावळे यांनी या शिबिराचे नियोजन केले आहे.

नागरिकांना मिळणाऱ्या महसुली सेवा:-

शिबिर स्थळी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित कामे तात्काळ निकाली काढली जाणार आहेत. यात प्रामुख्याने:

७/१२ उतारे: नवीन ७/१२ वाटप, वारस नोंदी, चुकांची दुरुस्ती आणि ई-मोजणी सेवा.

प्रमाणपत्रे: विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध दाखले आणि लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत प्रमाणपत्रांचे तात्काळ वितरण.

योजनांचा लाभ: संजय गांधी निराधार योजना व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या पात्रांना लाभ वाटप.

शेत रस्ते: मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता आदेशांचे वाटप.

तक्रार निवारण: पीएम किसान योजनेतील तक्रारींचे निवारण आणि फेरफार नोंदींची प्रक्रिया.

लासलगाव महसूल मंडळातील लासलगाव, टाकळी विंचूर, कोटमगाव, विंचूर, वेळापूर अशा विविध गावांतील सरपंच, पोलीस पाटील आणि नागरिकांनी या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button