खडकीतील सृष्टी मित्तलचा झेंडा — CBSE दहावी परीक्षेत ९६.६% गुणांसह अव्वल

खडकीतील सृष्टी मित्तलचा झेंडा — CBSE दहावी परीक्षेत ९६.६% गुणांसह अव्वल
पुणे (प्रतिनिधी): खडकी, बोपोडी आणि रेंज हिल्स परिसरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उज्ज्वल कामगिरी सृष्टी हेमंत मित्तल हिने केली आहे. रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, वाघोली (पुणे) येथील विद्यार्थिनी असलेल्या सृष्टीने CBSE दहावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ९६.६ टक्के गुण मिळवत परिसरात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सृष्टीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच यशाचे गमक असल्याचे सृष्टीने सांगितले.
तिच्या यशामागे पालकांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचेही तिने नमूद केले. सृष्टीचे वडील हेमंत मित्तल हे केटरिंग व्यवसायात कार्यरत असून आईनेही तिच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शिक्षकांनी सृष्टीच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सृष्टीने पुढे उच्च शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सृष्टी मित्तलचे हे यश खडकी, बोपोडी आणि रेंज हिल्स परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जर
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429


